दही तुमच्या सौंदर्यात करेल वृद्धी.....( Trending in India )


दही खाण्यास स्वादिष्ट तर आहेच, पण याच वापर जर आपण आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी केला तर आपल्या सौंदर्याला चार चांद वाढतील यात शंकाच नाही. त्वचेला मऊ आणि स्वच्छ ठेवण्यासाठी दह्यामध्ये  लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावा, गळा आणि हातालाही लावा  यामुळे त्वचा चमत्कारिकदृष्ट्या उजळते. केवळ १० मिनिटे हा लेप लावा आणि धुवून टाका. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर काही दिवस ठेवलेलं दही वापरा. चेहऱ्यावर थोडीशी चमक आणण्यासाठी  दह्यामध्ये थोडीशी बदाम पावडर आणि गुलाब जल मिसळून लावा. चेहऱ्यावरील मुरूम नाहीशे करण्यासाठी मुळ्याच्या रसात तेवढाच दही मिसळून मुरुमांवर लावा. हा उपाय काही दिवस नियमित करण्याने मुरूम नाहीसे होतात. 

Comments