म्हणून स्वतःला गुदगुल्या होत नाही. ( Trending in India )


स्वतःला कितीही गुदगुल्या करण्याचा प्रयत्न केला तरी होत नाही. याच कारण म्हणजे मेंदूला होणारी स्पर्शाची जाणीव. पोटावर, मानेवर, काखेत आणि तळपायांना कुणी गुदगुल्या केल्या कि आपल्याला त्या जाणवतात, आपण हसतो पण मात्र त्याच भागावर आपण स्वतःच्या हातानं गुदगुल्या केल्या तर का होत नाही ? 

असा प्रश्न अनेक वेळा पडला असेल.युकेतील मोलेक्युलर बायोलोजी आणि जेनेटिक्स  अभ्यास करण्याऱ्या डॉ. एमिली ग्रॉसमन  यांनी सांगितलं की "मेंदूच्या मागे असलेला सेरेबलम हा भाग स्पर्श ओळखतो त्यामुळे जेव्हा दुसरा व्यक्ती आपल्याला गुदगुल्या करतो , त्यावेळी वेगळा स्पर्श मेंदू ओळखतो. मात्र जेव्हा लोक स्वतःला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा होत नाही, कारण मेंदूला स्पर्श ओळखीचा असतो." या गोष्टीचा तुम्हाला एक फायदा होणार. 

"गुदगुल्या करण्यासाठी कुणी तुमच्या जवळ आलं तर, त्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श करा. त्यामुळे मेंदूला दुसऱ्या व्यक्तीचा स्पर्श जाणवणार नाही आणि तुम्हाला गुदगुल्या होणार नाही."

Comments